Welcome To Bari Samaj

Our Bari Samaj belongs to farmer class and our traditional business being farming & selling beetel leaves (Pan) along with other crops.

As far as education goes, our caste was not reached the level as compared to other classes and not comparable, but now with change in attitude, education and changing lifestyle we have attained and excelled in all the functionality wherever we are put on, we aspired to grow ourselves and educate


Creating an Account

Vadhu- Var

Var-Vadhu List जाहीर आभार

This section is for members to interchange information that would promote their matrimonial objectives.

Testimonials

प्रिय समाजबांधवांनो, सर्वांना सस्नेह नमस्कार! सन २००७ मध्ये माझे जिवलग मित्र स्व. दत्तात्रय गोविंदा मिसाळ यांच्या प्रेरणेने माझ्या समाजसेवेच्या प्रवासाला सुरुवात झाली. स्व. वसंत कपले सरांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्याचे संस्कार मिळाले. अमरावती येथील राष्ट्रीय महाअधिवेशनातून प्रेरणा घेऊन सन २००८ मध्ये शेगाव येथे वधू-वर परिचय मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. आज या उपक्रमाचा १९ वा मेळावा होताना मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो. मंडळाचे प्रशासकीय कामकाज, समाजबांधव जोडणी, मालमत्तेची देखभाल, फळेगाव येथील बारी भवनासाठी जमीन संपादन आणि विविध सामाजिक उपक्रमांत योगदान देण्याची संधी मला मिळाली. मंडळाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मानही लाभला; मात्र माझ्यासाठी पदापेक्षा कर्तव्य आणि कर्तव्यापेक्षा समाजहित नेहमीच श्रेष्ठ राहिले आहे. या संपूर्ण प्रवासात माझी पत्नी सौ. स्मिता आणि सुपुत्र डॉ. हर्षल यांची साथ, ज्येष्ठांचे आशीर्वाद, सहकाऱ्यांचे योगदान आणि समाजबांधवांचा विश्वास हीच माझी खरी शक्ती राहिली आहे. नव्या कार्यकारिणीने तरुणांचा व महिलांचा सहभाग वाढवून फळेगाव येथील बारी भवनाचे स्वप्न साकार करावे, ही मनापासून अपेक्षा आहे. माझ्या कार्याची आठवण राहिली नाही तरी चालेल; पण आपला बारी समाज एकसंध, समर्थ, सुशिक्षित आणि प्रगतिशील व्हावा, हीच माझ्या समाजसेवेची खरी सार्थकता आहे. जय बारी समाज! जय समाज एकता! जय महाराष्ट्र! धन्यवाद!

श्री. अशोक अस्वार

सर्वाना सस्नेह नमस्कार🙏 मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाची स्वतंत्र नाममुद्रा (बोधचिन्ह) असावी, ही संकल्पना मांडणाऱ्या सर्व दूरदृष्टीच्या व्यक्तींना माझा आदरपूर्वक नमस्कार! तसेच गेल्या पन्नास वर्षांत विविध कार्यकारिणींनी दिलेल्या योगदानामुळे आज आपण सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. सक्रिय सभासदांचे सहकार्य, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांचा सेवाभाव यामुळेच मंडळाची आजवरची वाटचाल यशस्वी झाली आहे. यापुढेही समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेगाव येथील वधू-वर परिचय मेळाव्यासारखे उपक्रम अधिक व्यापक आणि आधुनिक स्वरूपात सुरू ठेवावेत. त्याचबरोबर तरुणांसाठी वसतिगृह, रोजगाराच्या संधी, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम यांसारखे समाजोपयोगी प्रकल्प साकारण्याचे ध्येय आपण ठेवले पाहिजे. नवीन कार्यकर्ते घडविणे, जबाबदाऱ्यांचे योग्य वाटप करणे आणि भविष्यातील कामांचे नियोजन करणे ही आगामी कार्यकारिणीची महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण आजची एकजूट, उद्याच्या सक्षम समाजाचा भक्कम पाया आहे. एकजूट, सहकार्य आणि सेवाभावाच्या बळावर आपला बारी समाज अधिक संघटित, स्वावलंबी आणि प्रगतिशील व्हावा, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

श्री. सुरेंद्र बारी

सुवर्णमहोत्सवी मनोगत सर्व समाजबांधवांना सस्नेह नमस्कार! आपले मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळ यंदा स्थापनेची ५० वर्षे पूर्ण करून सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. या पन्नास वर्षांच्या प्रवासात मंडळाची स्थापना करून समाजकार्याचा पाया रचणारे कै. पंडितराव बारी, कै. श्रीराम बारी, श्रीमती आशाताई बारी, कै. धुळे साहेब आणि सर्व दिवंगत व हयात ज्येष्ठ समाजबांधव यांना मी विनम्र अभिवादन करतो. मंडळाचे पहिले नोंदणीकृत कार्यालय कळवा येथील श्री. पी. आर. बारी यांच्या निवासस्थानी होते, ही आपल्या इतिहासातील महत्त्वाची आठवण आहे. त्यानंतर कल्याण आणि २००३ मध्ये ठाणे येथे जागा संपादन करून समाजाने एकजुटीच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्ने साकार केली. या वास्तूंमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण, नोकरी आणि आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचा आधार मिळाला. ठाणे येथील जागा माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संपादन करता आली, याचे मला विशेष समाधान आहे. आज आपल्या समाजातील अनेक युवक-युवती शिक्षण, व्यवसाय आणि विविध क्षेत्रांत देश-विदेशात यश संपादन करीत आहेत. ही आपल्या सामूहिक प्रयत्नांची खरी फलश्रुती आहे. फळेगाव येथील बारी भवनाचे स्वप्नही लवकरच साकार होईल, असा मला विश्वास आहे. विद्यमान अध्यक्ष श्री. शैलेश पायधन, सचिव श्री. सुरेश ढगे आणि संपूर्ण कार्यकारिणीचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा! तसेच श्री. अशोक अस्वार आणि सर्व कार्यकर्त्यांना बारीनगरच्या प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठी यश लाभो, ही सदिच्छा. बारीनगर सहकारी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही शुभेच्छा! आपल्या पूर्वसुरींनी लावलेल्या समाजसेवेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. हा वटवृक्ष असाच बहरत राहो, त्याच्या छायेत भावी पिढ्यांची प्रगती होत राहो आणि आपला समाज सदैव एकसंध व प्रगतिशील राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद! जय बारी समाज!

श्री. रामदास बारी

मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! सन 1977 मध्ये स्थापन झालेले आपले मंडळ आज 50 वर्षांचा गौरवशाली टप्पा पूर्ण करीत आहे, ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक मान्यवरांनी समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. मंडळाचा माजी अध्यक्ष या नात्याने या प्रवासाचा एक भाग होता आले, हे मी माझे भाग्य समजतो. समाजातील एकता, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य मंडळाने सातत्याने केले आहे. शिक्षण, सामाजिक विकास आणि समाजातील नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याचे कार्य असेच पुढे सुरू राहो. नव्या पिढीने मंडळाच्या या गौरवशाली परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे न्यावा. मंडळाची भविष्यातील वाटचाल अधिक भव्य, यशस्वी आणि प्रेरणादायी ठरो. या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी मंडळास मनःपूर्वक शुभेच्छा!

श्री. प्रकाश गुर्जर

सर्व समाजबांधवांना सस्नेह नमस्कार! सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मुंबईतील बारी समाजबांधवांना एकत्र आणून समाजाची एकजूट व प्रगती साधण्याच्या उद्देशाने स्व. पंडितराव बंडूजी बारी यांनी समाजसंघटनेची संकल्पना मांडली. त्यांच्या पुढाकारातून १९७७ मध्ये मंडळाची स्थापना झाली आणि १९७८ मध्ये ‘मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळ’ या नावाने अधिकृत नोंदणी झाली. सन १९९४ ते १९९६ या काळात मंडळाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मला मिळाली. या कार्यकाळात समाजहितासाठी कार्य करताना सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल मी सर्वांचा मनःपूर्वक ऋणी आहे. समाजबांधवांच्या देणग्या आणि एकजुटीतून ठाणे रेल्वे स्थानकाजवळ उभी राहिलेली मंडळाची वास्तू ही आपल्या सामूहिक प्रयत्नांची मोठी उपलब्धी आहे. आजही येथे गरजू विद्यार्थ्यांना माफक दरात निवासाची सुविधा मिळत आहे, ही अभिमानाची बाब आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थापक, ज्येष्ठ मार्गदर्शक, देणगीदार आणि सर्व कार्यकर्त्यांच्या योगदानाला विनम्र अभिवादन! मंडळाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो आणि समाजातील एकता, बंधुभाव व सेवाभाव अधिक दृढ होवो, हीच सदिच्छा! धन्यवाद! जय बारी समाज!

श्री. प्रल्हाद राऊत

सप्रेम नमस्कार! आज आपल्या मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना मन आनंदाने आणि अभिमानाने भरून आले आहे. पन्नास वर्षांपूर्वी समाजबांधवांना एकत्र आणून एकजूट आणि समाजप्रगती साधण्याच्या उद्देशाने आम्ही मंडळाच्या स्थापनेचा संकल्प केला. विशेष आनंदाची बाब म्हणजे, मंडळाच्या स्थापनेच्या पहिल्या सभेचे आणि आजच्या सुवर्णमहोत्सवी सभेचे यजमानपद भूषविण्याचा मान मला लाभला, हे माझे भाग्य समजतो. संस्थापक सचिव आणि माजी अध्यक्ष म्हणून मंडळाच्या जडणघडणीत योगदान देता आले, याचे मला मनस्वी समाधान आहे. अनेकांच्या त्याग, परिश्रम आणि निःस्वार्थ सेवेतून आज मंडळाचे छोट्या रोपट्यापासून भव्य वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद आणि हितचिंतकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. युवा पिढीने शिक्षण आणि कर्तृत्वाच्या बळावर प्रगती करावी; मात्र आपल्या समाजाशी असलेली नाळ सदैव जपावी. ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांची ऊर्जा यांच्या संगमातून मंडळाने समाजप्रगतीची नवी शिखरे गाठावीत, हीच अपेक्षा आहे. हा सुवर्णमहोत्सव पुढील पन्नास वर्षांच्या उज्ज्वल वाटचालीचा नवा संकल्प ठरो आणि शतक महोत्सवही आपण सर्वांनी एकत्रितपणे साजरा करावा, हीच मनोकामना! सर्व समाजबांधवांना सुवर्णमहोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जय बारी समाज! जय समाजएकता!

श्री. पंडितराव बारी (अस्वार)

आदरणीय समाज बंधू-भगिनींनो, सादर प्रणाम! देवांचे गुरू बृहस्पती यांनी म्हटले आहे की, “यावत् जीवेत् सुखं जीवेत्। ऋणं कृत्वा घृतं पिबेत्। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः॥” म्हणजेच, जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत सुखाने जीवन जगावे. वेळप्रसंगी गरज पडल्यास ऋण काढून सण साजरा करायलाही हरकत नाही. कारण मनुष्यदेह भस्म झाल्यानंतर पुनरागमन कुठून होणार? जीवनात सुख प्राप्त करावयाचे असेल, तर सहजीवन अत्यंत आवश्यक आहे. सहजीवन हे सामाजिक एकत्रीकरणातून साध्य करता येते. त्यासाठी एकमेकांना समजून घेऊन जीवनक्रमण करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच, ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीचे पालन केल्यास सर्व काही शक्य आहे. आपला समाज याच तत्त्वांवर आजपर्यंत वाटचाल करत आला आहे, म्हणूनच तो प्रगतीपथावर आहे आणि पुढेही राहील. याला संघर्षाची जोड मिळाल्यास ‘सोने पे सुहागा’ असा परिणाम निश्चितच पाहायला मिळेल, यात तिळमात्र शंका नाही. शुभेच्छांसह आपला,

डॉ. व्ही. एन. डाबरे

एम.डी. – टी.पी.एम. (सायकीयाट्रिक).

आदरणीय समाज बंधू भगिनी सादर प्रणाम, मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पणात एक गोष्ट स्पष्ट दिसते की मंडळाच्या स्थापनेपासून ते आज पर्यंत समाजबांधवाकडे संपर्क करण्याचे माध्यमे बदल झाली असतील परंतु समाज बांधवांचे मंडळावरील प्रेम तसेच आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षात मंडळाच्या वेबसाईट वर मंडळाचे विविध कार्यक्रमाची माहिती समाज बांधवापर्यंत पोहचवण्याचा छान प्रयत्न करण्यात येत आहे. मंडळाचे आगामी कार्यक्रमाची माहिती वेबसाईट वर देण्यात येत आहे. सदर कार्यक्रमात सर्व समाजबांधवांनी अमूल्य उपस्थिती लावावी. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तन मन आणि धनाने मंडळाला सहकार्य करावे ही आपल्या कडे प्रार्थना .... धन्यवाद

श्री. विशाल महादेव काटोले.

मा. अध्यक्ष (2017-2022)

सर्व समाज बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार, आपल्या मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. संस्थापक अध्यक्ष कै. पंडितराव बंडू बारी यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या मंडळाची स्थापना झाली. सन 1977 यावर्षी लावलेल्या रोपट्याचा आज डेरेदार वटवृक्ष झालेला आहे. यासाठी आपल्या मंडळातील आजपर्यंतचे सर्व कार्यकर्ते समाज बंधू आणि भगिनींचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आपल्या कल्याण व ठाणे येथील जागेच्या सोयीमुळे गावाहून येणाऱ्या समाज बांधवांना शिक्षणासाठी नोकरीसाठी तसेच हॉस्पिटलच्या कामासाठी राहण्याची उत्तम अशी सोय करण्यात आलेली आहे हे चांगले कार्य आपले मंडळ करीत आहे. अशाच प्रकारे आपल्या मुंबई विभाग बाजार समाज विकास मंडळाला आपण सहकार्याने, निष्ठेने, जिद्दीने, विचाराने, निर्धाराने आणि हसतमुखाने पुढे नेऊ या. शुभेच्छांसह आपला

सुरेश भिका बारी

सस्नेह नमस्कार! दि. १७ नोव्हेंबर १९७७ रोजी स्थापन झालेल्या मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाचा ५० वर्षांचा प्रवास हा सामाजिक एकजूट, परस्पर विश्वास आणि निःस्वार्थ सेवेची प्रेरणादायी गाथा आहे. या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा भाग होणे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांपासून सुरू झालेल्या मंडळाच्या कार्याचा विस्तार आज संपूर्ण महाराष्ट्रात झाला आहे. शेगाव येथील वधू-वर परिचय मेळावे, स्नेहसंमेलने आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासव्यवस्था अशा उपक्रमांतून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या यशस्वी वाटचालीचा पाया रचणारे संस्थापक, माजी अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, देणगीदार आणि सर्व समाजबांधव यांचे योगदान अमूल्य आहे. त्या सर्वांप्रती मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. अध्यक्षपद ही माझ्यासाठी केवळ प्रतिष्ठा नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. आगामी काळात शिक्षण, रोजगार, उद्योजकता, युवकांचे सक्षमीकरण आणि महिला प्रगती यांना प्राधान्य देऊन मंडळाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा आमचा संकल्प आहे. संस्थेचे खरे यश तिच्या वैभवात नसून, समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीत आहे. म्हणूनच ज्येष्ठांचा अनुभव, तरुणांची ऊर्जा आणि सर्वांची एकजूट यांच्या बळावर समाजाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करूया. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित होणाऱ्या १६ व्या स्मरणिकेच्या निर्मितीसाठी योगदान देणारे संपादक मंडळ, लेखक, जाहिरातदार, देणगीदार आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! मंडळाची वाटचाल अशीच प्रगतीशील राहो आणि शतक महोत्सव अधिक वैभवाने साजरा करण्याचे भाग्य लाभो, हीच सदिच्छा! आपला स्नेहांकित,

शैलेश पायघन

अध्यक्ष मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळ

Finding the soul mate may not be easy,
We made it simple through…

Register Now

Donate to keep the vision alive…

Donate!